पुणे – रविवारी संध्याकाळी व आज सकाळी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्याने पुणे शहरातील हडपसर आणि फातिमानगर ते वैदूवाडी पुलावर व त्यापुढील रस्त्यावर 30-35 वाहने घसरून पडली आहेत. पाऊस पडल्यामुळे रस्ता घसरडा झाला आहे. त्यामुळे वाहने सहजच घसरत आहेत. आणि छोट्या मुलांचे व वयोवृद्ध लोक तसेच काही महिला यात जखमी झालेल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या अहवालानुसार, येत्या 11 ते 13 डिसेंबर दरम्यान राज्यातील अनेक शहरांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात आठवडाभर म्हणजे 16 डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
आज 12 डिसेंबर रोजी दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत तुरळक पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे ऐन पावसाच्या वातावरणात नागरिकांनी वाहन चालविताना काळजी घ्यावी असं देखील सांगण्यात आलं आहे.