Accident News – बिहारच्या खगरिया जिल्ह्यात आज सकाळी एका प्रवासी जीपची ट्रॅक्टरला धडक बसल्याने झालेल्या अपघातात तीन मुलांसह नऊ जण ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पसराहा भागातील राष्ट्रीय महामार्ग ३१ वरील पेट्रोल पंपाजवळ सकाळी साडे सहा च्या सुमारास झालेल्या अपघातात अन्य सहा जण जखमी झाले आहेत.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, जीपमध्ये प्रवास करणारे लोक एका लग्नातून परतत असताना हा अपघात झाला. ट्रॅक्टर ओव्हरलोड होता. सर्व मृतांची ओळख पटली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येत आहेत.
जीपमध्ये क्षमतेपेक्षा अधिक संख्येने प्रवासी भरले होते. त्यात ही जीप भरधाव वेगाने येत होती. त्यामुळे तिच्यावर चालकाचे नियंत्रण राहिले नाही त्यातून हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. ( Accident Bihar )