– हिमांशू
‘लग्न पाहावं करून’असं म्हणण्यामागे खर्चाची धास्ती हा प्रमुख ङ्गॅक्टर असला तरी लग्नकार्यातला उत्साह तसूभर कमी झालेला नाही. उलट तो वाढतानाच दिसतो. लग्न हा आयुष्यात एकदाच येणारा अनुभव असल्यामुळं तो संस्मरणीय करण्याकडे सर्वांचाच यथाशक्ती कल असतो. सुदैवानं तो संस्मरणीय करण्याचे मार्गदिवसेंदिवस वाढतच आहेत. पूर्वी आर्थिकदृष्ट्या सुदृढ कुटुंबातले लग्नसोहळे चार-चार दिवस चालायचे. हल्ली कार्यासाठी एवढी सवड काढणं शक्य नसतं.
त्यामुळं एकाच दिवसात जास्तीत जास्त इव्हेन्ट कसे प्लॅन करता येतील, असा विचार होतो. त्यामुळं पत्रिका, वर्हाडी, वाजंत्री, अक्षता, होमहवन आणि मेजवानी एवढ्यापुरतं लग्नकार्य सीमित राहिलेलं नाही. लग्नाच्या इव्हेन्ट मॅनेजमेन्टला स्वतंत्र व्यवसायाचं रूप आलंय.
परंपरा जपतानाच सोहळ्यात आधुनिकता कशी आणता येईल, याचा आवर्जून विचार होतो. या आधुनिक प्रक्रियेतला महत्त्वाचा इव्हेन्ट म्हणजे ‘प्री-वेडिंग शूट!’ लग्नापूर्वी वधुवरांना सुंदर, निसर्गरम्य परिसरात नेऊन वेगवेगळ्या पोझेसमध्ये त्यांचे ङ्गोटो, व्हिडिओ काढणंआणि नंतर एडिट केलेली ङ्गिल्म लग्नसमारंभात दाखवणं, ही मूळ संकल्पना. तपशिलात ङ्गरक असू शकतो. लग्नापूर्वी वधुवरांनी एकमेकांना भेटायचंही नसतं, असं मानणार्या काही कुटुंबांचा किंवा व्यक्तींचा याला विरोध असला तरी ‘प्री-वेडिंग शूट’चा व्यवसाय चांगलाच रुजलाय, त्यात मोठी आर्थिक उलाढाल होते आणि त्यातून अनेकांना रोजगार मिळालाय, हे वास्तव. पण हल्ली अनेकदा यासाठी तर्हेतर्हेचे धोके पत्कले जातायत.
ठरलेलं लग्न मोडल्यास प्री-वेडिंग ङ्गोटोशूटचा गैरवापर होण्यापासून ङ्गोटोसाठी जिवाचा धोका पत्करण्यापर्यंत अनेक घटना आपल्या कानावर येतात. पण कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातली घटना ङ्गारच वेगळी! हल्ली प्री-वेडिंग शूटिंगमधला तोचतोपणा टाळण्यासाठी ‘थीम’ तयार करणं हे खास कौशल्य विकसित झालंय. वधुवराच्या करिअरपासून उपलब्ध पोशाखांपर्यंत विविध गोष्टींचा विचार करून ही ‘थीम’ तयार केली जाते. चित्रदुर्ग जिल्ह्यातल्या सरकारी रुग्णालयात नव्यानं रुजू झालेल्या एका डॉक्टरचं प्री-वेडिंग शूट सध्या खूप गाजतंय.
या महाशयांनी पेशानुसार ‘थीम’ निवडली असावी. त्यामुळं वधुवरांसमवेत आणखी एका ‘कलाकारा’ची त्यात एन्ट्री झाली. रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये हा कलाकार रुग्ण बनून पहुडला आणि वधुवराने हिरवे अॅप्रन परिधान करून त्याचं खोटंखोटं ऑपरेशन केलं. एवढ्याशा शॉटसाठी ऑपरेशन थिएटरचा सेट वगैरे कोण उभारणार? त्यामुळं खर्याखुर्या थिएटरमध्येच हे शूटिंग झालं.
पण त्या शूटिंगची क्लिप जेव्हा व्हायरल झाली, तेव्हा डॉक्टरला नोकरीच गमवावी लागली. कारण महाशयांनी जे ऑपरेशन थिएटर चित्रीकरणासाठी वापरलं, ते त्याच सरकारी रुग्णालयातलं होतं. क्लिप व्हायरल झाल्यावर कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांसह उच्चपदस्थ अधिकार्यांना या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी लागली.
खरी स्टोरी तर पुढेच आहे. महाशयांनी ज्या थिएटरमध्ये आपल्या भावी पत्नीसमवेत ‘ऑपरेशन प्री-वेडिंग’ केलं ते चार महिन्यांपासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद होतं आणि डॉक्टर महाशयांची नियुक्ती एकाच महिन्यापूर्वी झाली होती. एवीतेवी ऑपरेशन थिएटर बंद आहेच तर तिथे शूटिंग का करू नये, असा विचार ‘कन्सेप्ट’ तयार करणार्याच्या डोक्यात आला असावा. व्हायरल क्लिपमध्ये ऑपरेशन सुरू असताना पेशंट अचानक उठून बसल्याचं दिसतंय. त्याच्या चेहर्यावर जे विस्मयाचे भाव आहेत, ते आता डॉक्टर महाशयांच्या चेहर्यावर असतील.