पुणे -केंद्र सरकारने कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या व्यावसायिक वाहनांवरील वाहन प्रवेश कर रद्द केल्याने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाला दरवर्षी सुमारे 13 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.
11 एप्रिलच्या अधिसूचनेनुसार, वाहन प्रवेश कर वसुलीसाठी पूर्वीची मंजुरी रद्द करण्यात आली आहे. पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड 2001 पासून त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करणाऱ्या व्यावसायिक वाहनांवर वाहन प्रवेश कर आकारत आहे. अर्थिक अडचणीत असलेल्या कॅंटोन्मेंट बोर्डासाठी हा एक महत्वाचा कमाईचा स्त्रोत होता.
कॅंटोन्मेंटमध्ये सुमारे 13 पॉइंट्स आहेत जिथे हा कर गोळा केला जातो आणि दरवर्षी अंदाजे 13 कोटी रुपयांची कमाई होते. कॅंटोन्मेंटला अद्याप राज्य सरकारकडून जीएसटीची थकबाकी मिळालेली नाही. या निर्णयामुळे कॅंटोन्मेंट बोर्डाची आणखी गोची होणार आहे.
पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी सदस्य विनोद मथुरावाला म्हणाले की, वाहन प्रवेश कर हा बोर्डाच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत होता. त्याचून वीज बिल किंवा काही विकास कामांशी संबंधित इतर खर्च भागवले जायचे.