गाझियाबाद – आपल्या मुलाने शाळेमध्ये चांगला अभ्यास करुन चांगले गुण मिळावेत आणि यशस्वी व्हावे अशी भावना सर्वच पालकांची असते पण या भावनेचा दुसरा अर्थ विद्यार्थ्याने घेतला तर त्यातून अनर्थ समोर येतो सतत अभ्यास कर म्हणून पालक तगादा लावत असल्याने अभ्यासाच्या या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी एका विद्यार्थ्याने चक्क आपल्या मित्राचा खून केला गुन्हा केल्यामुळे तुरुंगात जावे लागेल आणि तुरुंगात अभ्यासापासून मुक्तता मिळेल या एकाच भावनेने त्याने हा खून केल्याचे समोर आले आहे.
हा विद्यार्थी सोळा वर्षाचा असून दहाव्या इयत्तेत शिकत होता त्याचे आई वडील सतत त्याला अभ्यासासाठी तगादा लावत होते पण त्याला अभ्यास करण्यामध्ये कोणताही रस नव्हता त्यामुळे गेल्या सात महिन्यांपासून अभ्यासापासून मुक्तता कशी मिळवायची याबाबत त्याचा विचार सुरू होता सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की जर आपण एखादा गुन्हा करून तुरुंगात गेलो.
तर आपल्याला अभ्यास करावा लागणार नाही म्हणून त्याने चक्क खून करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्याने नीरज नावाच्या एका तेरा वर्षे मुलाशी नव्याने मैत्री केली गेल्या आठवड्यात संधी मिळताच त्याने नीरजला गावाबाहेर नेऊन त्याचा गळा दाबून खून केला तो खरोखर मेला आहे की नाही हे बघण्यासाठी त्याने एका बाटलीच्या काचाही त्याच्या गळ्यामध्ये खुपसल्या आणि नीरज मेल्याची खात्री केली.
पोलिसांनी जेव्हा खुनाचा तपास सुरू केला तेव्हा त्यांना या मुलावर संशय आला पोलीसी खाक्या दाखवल्यावर त्याने आपण नीरजचा खून केल्याचे स्पष्ट केले पण खून करण्यासाठी जे कारण सांगितले ते ऐकताच पोलीस मात्र थक्क झाले आपण आपल्या मित्राचा खून केला आहे याबाबत कोणतीही अपराधीपणाची भावना त्याच्या चेहऱ्यावर कबुली जबाब देताना नव्हती त्या मुलाचे वय कमी असल्याने त्याला तुरुंगात न पाठवता सुधारगृहात पाठवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे.