नवी दिल्ली – दिल्ली महापालिकेत उपराज्यपालांनी नियुक्त केलेल्या एल्डरमेनला लोकनियुक्त नगरसेवकांच्या आधी शपथ दिल्याबद्दल आपने सोमवारी येथील भाजप मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. महापौर निवडणुकीत भाजपवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोपही आम आदमी पक्षाने केला आहे.
दिल्लीचे मंत्री राज कुमार आनंद, आपचे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज आणि पक्षाचे नेते आदिल अहमद खान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
6 जानेवारी रोजी दिल्ली महानगरपालिकेच्या सभागृहाची पहिली बैठक तेथे झालेल्या गदारोळामुळे महापौर आणि उपमहापौरांची निवड न करताच तहकूब करण्यात आली होती. या बैठकीत भाजप आणि आप नगरसेवकांमध्ये जोरदार शब्दिक चकमक आणि धक्काबुक्की झाली होती.
धक्कादायक! ‘या’ जमातीचे लोक खात चक्क माणसांचा मेंदू! अंत्यसंस्काराच्या वेळी पाळतात विचित्र परंपरा!
भाजपने या निवडणुकीत बेकायदेशीरपणे आपल्या समर्थक प्रतिनिधींची संख्या वाढवून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रयत्न चालवला आहे, असा आम आदमी पक्षाचा आरोप आहे.