नवी दिल्ली – दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी दिल्ली सरकारच्या प्रदुषण नियंत्रणासाठीची मोहीम मुद्दाम विनाकारण रखडवल्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. फलक घेऊन आंदोलक राज्यपाल निवास मार्गावर जमले आणि त्यांनी सक्सेना यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
सक्सेना यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वॉटर कॅनॉनचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय राजधानीत ‘रेड लाईट ऑन, गाडी ऑफ’ ही वाहन प्रदुषण नियंत्रणाची मोहीम शुक्रवारी सुरू होणार होती. परंतु नायब राज्यपालांनी त्यालाही मंजुरी दिली नाही.
आम आदमी पक्षाच्या सरकारचा प्रत्येक निर्णय असा अडकवून दिल्लीच्या विकासात सातत्याने खोडा घालण्याचे काम नायब राज्यपालांमार्फत केले जात आहे असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.