नवी दिल्ली – दिल्लीतील राजिंदर नगर मतदार संघात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार दुर्गेश पाठक विजयी झाले. त्यांनी भाजप उमेदवाराचा 11 हजार मतांनी पराभव केला.
मतमोजणीच्या सर्व 16 फेऱ्यांमध्ये पाठक हे भाजप उमेदवार राजेश भाटीया यांच्यापेक्षा आघाडीवर होते. पाठक यांना 40 हजार 319 मते मिळाली तर भाजप उमेदवाराला 28 हजार 851 मते मिळाली.
कॉंग्रेस उमेदवार प्रेमलता यांना केवळ 2014 मते मिळाली. या मतदार संघात 23 जुनला झालेल्या मतदानात केवळ 43.75 टक्के मतदारांनी मतदान केले होते. या विजयाने आम आदमी पक्षाच्या सरकारवर येथील जनतेने पुन्हा एकदा विश्वास प्रकट केला आहे असा दावा आम आदमी पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे.