लंडन – ब्रिटनमध्ये बोरिस जॉन्सन यांची जागा घेण्यासाठी अर्थात त्या देशाचे पंतप्रधान पद मिळवण्यासाठी भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि लीझ ट्रस यांच्यात जोरदार चुरस आहे. टीव्हीवर चर्चेद्वारे दोन्ही नेते आपापली बाजू आणि मते मांडताना दिसत आहेत. असाच कार्यक्रम सुरू असताना त्याचे सूत्रसंचालन करणारी अँकर अचानक बेशुध्द झाल्याने गोंधळ उडाला आणि कार्यक्रम थांबवावा लागला.
केट मॅकनन हे त्या अँकरचे नाव असून मंगळवारी ही घटना घडली. ऋषी सुनक आपले मत मांडत असताना अचानक गोंधळ उडाला आणि ओ माय गॉड असा आवाज आला.
A TV host faints during the UK’s second leaders’ debate between Liz Truss and Rishi Sunak pic.twitter.com/blovJGPiMK
— TICKER NEWS (@tickerNEWSco) July 26, 2022
केटीची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे हा कार्यक्रम पुढे सुरू ठेवण्यास संबंधित वाहिनीने असमर्थता दर्शवली. दरम्यान, सुनक यांनी त्या अँकरला लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सुनक आणि ट्रस यांच्यातील चुरस 5 सप्टेंबर रोजी संपणार आहे कारण त्या दिवशी ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानाच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.