नवी दिल्ली- दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या ‘शीला दीक्षित’ यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं आहे. शीला दीक्षित गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने फोर्टीस एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर युपीएच्या अध्यक्षा ‘सोनिया गांधीं’नी त्यांना श्रद्धांजली दिली.
Delhi: UPA Chairperson Sonia Gandhi pays tribute to former Delhi Chief Minister Sheila Dikshit. pic.twitter.com/FxKxCCT48J
— ANI (@ANI) July 20, 2019