- सुरक्षेसाठी घेतली जातेय खबरदारी
कार्ला – “कोविड-19’च्या पार्श्वभूमीमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली पर्यटन केंद्र हळूहळू सुरू होत आहे. लोणावळा कार्ला येथील महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाचे पर्यटन केंद्र देखील पर्यटकांसाठी सज्ज झाले आहे.
करोना काळात पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणात फटका बसला. आता अनलॉक काळात संभाव्य पर्यटन वृध्दी लक्षात घेता. पर्यटन केंद्र पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाली असून, खबरदारीची उपाययोजना करत यामध्ये सर्व उपहारगृह व अन्य सुविधांसह परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
तसेच पर्यटन केंद्रांत आलेल्या पर्यटकांचे स्वागत करुन त्यांना सॅनिटायझरचा वापर करण्यास विनंती करणे, आलेल्या पर्यटकांचे शरीराचे तापमान व ऑक्सिजनची लेवल नोंद घेत त्यांच्या मागील प्रवास यांची नोंद घेतली जात आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या रुमचे सॅनिटायझर करुन रुम दिला जाणार आहे.
करोना प्रादूर्भाव होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात येत असल्याची माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक दीपक हरणे व कार्ला एमटीडीसी व्यवस्थापक महादेव हिरवे यांनी दिली.