स्मार्टफोन हरवलाय? मग सॅमसंगचे ‘हे’ अ‍ॅप इंटरनेटशिवाय तुमचा फोन शोधेल…

जेव्हा एखाद्याचा मोबाईल (स्मार्टफोन)हरवला असेल तर तो शोधणे खूप अवघड आहे, परंतु आता एखाद्याचा सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन, गॅलेक्सी वॉच, टॅबलेट किंवा इअरबड हरवल्यास ते शोधणे सोपे होईल. वास्तविक, सॅमसंगने एक अ‍ॅप लॉन्च केला आहे. या अ‍ॅपपचे नाव आहे स्मार्टथिंग्ज फाइंड (SmartThings Find app). 

या अ‍ॅपव्दारे आपला गमावलेला गॅलेक्सी स्मार्टफोन इंटरनेट कनेक्शनशिवाय आणि मोबाइल नेटवर्कशिवाय सापडेल. चला तर, हे अनोखे अ‍ॅप कार्य कसे करेल आणि आपला गमावलेला फोन कसा शोधायचा ते जाणून घेऊ……..

या अ‍ॅपबद्दल माहिती देताना सॅमसंगने सांगितले की स्मार्ट थिंग्ज फाइन्ड अ‍ॅपपमध्ये ब्लूटूथ लो एनर्जी (बीएलई) आणि अल्ट्रा-वाइडबँड तंत्रज्ञान वापरले आहे. या तंत्रज्ञानासह, हे अ‍ॅप गमावलेला गॅलेक्सी डिव्हाइस शोधून काढेल. डिव्हाइस शोधल्यानंतर, हे अ‍ॅप वापरकर्त्यास नकाशा आणि ध्वनीद्वारे गमावलेल्या डिव्हाइसपर्यंत पाठवेल.

हे अनोखे सॅमसंग अ‍ॅप केवळ गॅलेक्सी स्मार्टफोन आणि टॅब्लेटना समर्थन देतो जे  अ‍ॅन्ड्राईंड -8(Android 8) आणि नंतरच्या ओएसवर कार्य करतात. याशिवाय, त्या गॅलेक्सी घड्याळांमध्ये देखील कार्य करेल ज्यात  टिझेन 5.5 (Tizen 5.5) किंवा नंतरचा ओएस असेल. गॅलेक्सी बड्स प्लस आणि गॅलेक्सी बड्स लाइव्हला या फिचरसाठी ओएस अपडेट्स मिळणे सुरू झाले आहे.

बीएलई सिग्नल शोधण्यात मदत करेल

या अ‍ॅपच्या तपशीलांविषयी माहिती देताना सॅमसंगने सांगितले की हरवलेलं डिव्हाइस 30 मिनिटांसाठी ऑफलाइन राहिल्यानंतर बीएलई सिग्नल त्यातून येऊ लागतो. हे सिग्नल इतर डिव्हाइसद्वारे प्राप्त केले जाऊ शकतात. यानंतर हरवलेल्या डिव्हाइसचा शोध घेण्यासाठी आपण वापरत असलेल्या सिग्नलसह स्मार्टथिंग्ज अ‍ॅप वापरला जाऊ शकतो.

हरवलेल्या डिव्हाइसजवळ आल्यानंतर आपण त्या डिव्हाइसला आपल्या इच्छेनुसार ‘रिंग’ करू शकता. या व्यतिरिक्त  एआर(AR) आधारित शोधाद्वारे एखादी व्यक्ती डिव्हाइसपर्यंत जाऊ शकते. आपल्या डिव्हाइसच्या डेटाचे कोणतेही नुकसान होणार नाही. यात एन्क्रिप्शनमुळे वापरकर्त्याचा डेटा पूर्णपणे सेफ होतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.