बॉलिवूडचा ‘संजू बाबा’ अर्थात संजय दत्तने फुप्फुसाच्या कर्करोगावर यशस्वी मात केली आहे. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. ‘केवळ माझे कुटुंबिय, डॉक्टर आणि तुमच्या सर्वांच्या आशिर्वादामुळे ही शक्य झाले आहे’, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. काहीच दिवसांपूर्वी संजय दत्तचे फोटो व्हायरल झाले होते. यात त्याची प्रकृती ढासळलेली दिसल्याने चाहत्यांना धक्का बसला होता.
मात्र, आता संजय दत्तने स्वतः ही आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे. केवळ संजूबाबाच नव्हे तर बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी कॅन्सर सारख्या असाध्य रोगावर आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीने यशस्वी मात केली आहे. पाहुयात, कोण आहेत हे लढवय्ये कलाकार?
मनीषा कोईराला ( manisha koerala ) –
‘बॉम्बे’, ‘दिल से’, ‘खामोशी’ यासारख्या सुंदर चित्रपटातून आपल्या संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केलेल्या अभिनेत्री मनीषा कोइरालाला 2012 मध्ये ओव्हिरियन कॅन्सर असल्याचे समोर आले होते. यानंतर तिने अमेरिकत उपचार घेत या आजारावर मात केली. मनीषाने आपल्या संघर्षाबद्दल ‘Healed: How Cancer Gave Me A New Life’ नावाचे पुस्तक देखील लिहिले.
सोनाली बेंद्रे ( sonali bendre ) –
नव्वदच्या दशकातील अत्यंत मोहक आणि नाजूक अभिनेत्री सोनाली बेंद्रेला 2019 मध्ये हाय ग्रेड कॅन्सर असल्याचे समोर आल्यानंतर सर्वांना धक्का बसला होता. सोनालीने स्वतः सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली होती. तिने न्यूयॉर्कमध्ये यावर उपचार घेतले व कॅन्सरवर मात करत नवीन आयुष्याला सुरुवात केली.
लिसा रे ( lisa ray ) –
बॉलिवूड अभिनेत्री लिसा रे ने वर्ष 2001 मध्ये ‘कसूर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये करियर सुरु केले होते. मात्र 2009 मध्ये तिला मल्टीपल माइलोमा नावाचा कॅन्सर असल्याचे आढळले. हा एक दुर्मिळ कॅन्सर असून, खूप कमी लोकांना होतो. वर्ष 2010 मध्ये तिने स्टेम सेल ट्रांप्लांट करुन या आजारावर मात केली.
ताहिरा कश्यप ( tahira kashyap ) –
कॅन्सरशी झुंज देऊन त्यावर मात करणाऱ्यांमध्ये अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपचा देखील समावेश आहे. ताहिराने आपल्या या आजारासंबंधी कॅन्सर सर्जरी, बाल्ड लूकचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ताहिराला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता, मात्र तिने या आजारावर मात केली.
राकेश रोशन ( rakesh roshan ) –
अभिनेता हृतिक रोशनचे वडील, ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक राकेश रोशन यांनादेखेळ 2018 ला घशाच्या र्करोगाचे निदान झाले होते. मात्र, केमोथेरपी आणि शस्त्रक्रियेने त्यांनी कॅन्सरवर मात केली.
दिग्दर्शक, लेखक अनुराग बसू यांनादेखील 2004 मध्ये कर्करोगाचे निदान झाले होते. मात्र योग्य उपचार घेऊन या संकटातून ते यशस्वीपणे बाहेर पडले.