कार्ला – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली लोणावळ्याजवळील वेहरगाव-कार्ला येथील आई एकवीरा देवी नवरात्र उत्सव सुरू असून, यावर्षी करोना पार्श्वभूमीवर मंदिर व दर्शन बंद असल्याने देवीचे ऑनलाइन दर्शन सुरू करण्यात आले आहे. आता तुमच्या मोबाईलवर देखील दर्शन मिळणार आहे.
नवरात्र उत्सव काळात देवस्थान प्रशासकीय समितीचे अध्यक्ष न्यायाधीश संजय मुळीक, सचिव तहसीलदार मधुसूदन बर्गे, संचालक सहायक धर्मादाय आयुक्त राहुल चव्हाण, व्यवस्थापक मंगेश गायकवाड, बाळासाहेब गायकवाड यांच्या प्रयत्ननातून एकवीरा देवीचे ऑनलाइन दर्शन सुरू करण्यात आले आहे.
शमारू भक्ती ऍप व https://shemaroobhakti.page.link ऍप व लिंकवर ऑनलाइन दर्शन सुरू आहे. भाविकांनी ऑनलाइन दर्शन घ्यावे, असे आहवान देखील देवस्थानच्या प्रशासकीय समितीकडून करण्यात आले आहे.