पुणे – स्वारगेटमधील सेव्हन लव्हज चौक ते वखार महामंडळ चौकापर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी बुधवारपासून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सॅलिसबरीकडून येणारी वाहतूक डाव्याबाजूस वळून गिरीधरभवन चौकाकडे मार्गस्थ करण्यात आली आहे. महर्षीनगरकडून येणारी वाहतूक डाव्या बाजूस वळून सेव्हन लव्हज चौकातून पुढे वळविण्यात आली आहे.
नेहरु रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूूक सेव्हन लव्हज चौकाकडून गंगाधाम चौकाकडे जाणारी आणि गंगाधामकडून सेव्हन लव्हजकडे येणारी वाहतूक सुरु ठेवली जाणार आहे. लक्ष्मीनारायण चौकाकडून गिरीधरभवनला जाणारी वाहतूक रांका चौकातून उजवीकडे वळून मार्गस्थ केली जाणार आहे.