मंचर -करोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंचर आणि घोडेगाव पोलिसांनी 400 व्यक्तींवर कारवाई करून 85 हजार 500 रुपये दंड वसूल केला. तसेच ही कारवाई यापुढेही सुरू राहील.
मंचर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या 6 पोलीस बीट, मंचर शहर आणि पुणे-नाशिक महामार्ग या परिसरातील सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या तसेच विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून 61 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला.
तर घोडेगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत 23 हजार 900 रुपये दंड नागरिकांकडून वसूल करण्यात आला आहे. नियम न पाळणाऱ्या 93 जणांकडून 22 हजार 500, 7 वाहनचालकांवर कारवाई करत 1 हजार 400 असा एकूण 23 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर 100 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.