– दैनिक प्रभातच्या वृत्तानंतर महावितरणला जाग
शिक्रापूर – जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथील शिक्रापूर-चाकण रस्त्यालगत धोकादायक वीजखांब तुटलेला हेता. याबाबत जातेगाव खुर्द येथे विद्युत खांबाचा धोका या मथळ्याखाली दैनिक प्रभातने वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत महावितरण विभागाने तातडीने तो धोकादायक वीजखांब बदलण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
जातेगाव खुर्द येथील चाकण-शिक्रापूर रस्त्यालगत माउली हॉटेलजवळ एक वीजखांब तुटलेला होता. मात्र या खांबावरील विद्युत प्रवाह नेहमी सुरू असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत येथील स्थानिक नागरिकांनी महावितरणकडे तक्रार करूनही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. दैनिक प्रभातने याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच महावितरण विभागाने तातडीने धोकादायक वीखांब हटवून नवीन वीखांब तेथे उभा केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह मंगेश मासाळकर यांनी समाधान व्यक्त करत दैनिक प्रभातचे आभार मानले.