नवी दिल्ली: देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेले दिल्ली अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष झफरूल इस्लाम खान यांना दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन शुक्रवारी मंजूर केला. न्या. मनजिकुमार ओहरी यांनी हा आदेश दिला.
पोलिसांनी खान यांचा ताबा तपासासाठी आवश्यक नसल्याची भूमिका मांडली. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
कट्टर हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे अरब राष्ट्रे आणि मुस्लिम जगात दुरावा निर्माण होईल.
देशातील विद्वेषी प्रचार आणि दंगलीमुळे त्यात भर पडेल अशा आशयाची फेसबूक पोस्ट टाकली होती. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.