आनंदच्या वर्चस्वाला ग्रहण

चेन्नई – भारताचा ग्रॅण्डमास्टर विश्‍वनाथन आनंद याच्या जागतिक वर्चस्वाला लेजण्ड्‌स बुद्धिबळ स्पर्धेत ग्रहण लागले. त्याला नवव्या फेरीतही पराभव पत्करावा लागला असून या स्पर्धेतील त्याचा हा 8 वा पराभव ठरला आहे. वासिली इव्हानचूकने त्याला 3-2 असे पराभूत केले.

पाच वेळा जगज्जेतेपद मिळविलेल्या आनंदसाठी ही स्पर्धा कारकीर्द संपत आल्याची नांदी ठरत आहे. आनंदचे वयाची पन्नाशी पार केली असून एखाद्या स्पर्धेत 9 फेऱ्यांत 8 पराभव स्वीकारण्याची त्याची संपूर्ण कारकिर्दीतील पहिलीच वेळ आहे.

या स्पर्धेत 8 पराभव स्वीकारल्यावर आनंदला आता पुढील काळात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सरस कामगिरी करण्याचे दडपण राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.