पंजाबी गायक गुरु रंधावाचे इंस्टाग्रामवर 18 मिलियन म्हणजे 1.8 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. यानिमित्त गुरुने व्हिडिओ-होस्टिंग ऍपवर ब्लॅक सूटमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिले की, इंस्टाग्रामवर 18 मिलियन फॉलोअर्स झाल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
प्रेम आणि सन्मान.या पोस्टाला फोटो-शेअरिंग वेबसाइटवर तब्बल 6 लाख 82 हजार लाइक्स् मिळाल्या आहेत. गुरुला “लाहौर’, “पटोला’ “हाई रेटेड गबरू’,”सूट’, “बन जा राणी’, “इशारे तेरे’, “फॅशन’, “डाउनटाउन’ आणि “स्लोली स्लोली’ यासारख्या प्रसिद्ध गाण्यांसाठी ओळखले जाते. या गाण्यांना चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. विशेष करून युवकांमध्ये गुरुची क्रेझ आहे.
गायक गुरुने काही दिवसांपूर्वीच गावाची आठवण येत आहे, असे सोशल मीडियावर शेअर केले आहे. तसेच आपला एक नवीन लुकही चाहत्यांसाठी शेअर केला होता. यातील काही फोटोंमध्ये तो शर्टलेस असल्याचे दिसून आले होते. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास त्याने नुकतेच रंगमंचावर वापसी केली आहे.