शिरूर -निमोणे (ता. शिरूर) येथे मित्राचा वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी 40 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती शिरूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे.
संकेत ज्ञानदेव काळे, हर्षल गोसावी, निलेश घोडे, केतन शिंदे, अजय गायकवाड, बंटी ईचके, अजिंक्य पवार, शुभम वाबळे, दीपक जाधव, बंटी गव्हाणे, अक्षय काळे सार्थक जगदाळे व त्याचे इतर अनोळखी मित्र यांच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.