वॉशिंग्टन : चीनचा भारताशी भयानक संघर्ष झाला आहे. या काळात अमेरिकेने आपले युरोपमधील सैन्य मागे घेऊन ती ताकद भारताच्या पाठीशी उभी करावी, असे मत अमेरिकेचे संरक्षण उपमंत्री माईक पोम्पीओ यांनी व्यक्त केले आहे.
चीनकडून भारताला आणि आग्नेय आशियाई देशांना धोका आहे. दक्षिण चीनी समुद्रात चीनचे आव्हान वाढले आहे. अमेरिकेने त्यामुळे जर्मनीत तैनात केले सैन्य मागे घेऊन ते या भागात तैनात करावे, अशी सूचना पोम्पिओ यांनी केली. ते ब्रुसेल्स फोरम ऑफ जर्मन मार्शल फंडच्या व्हर्चूअल बैटकीत बोलत होते.
चीनचा विस्तारवाद हे आजच्या काळातील सर्वात मोठे आव्हान आहे. आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेने आपले बळ तैनात करण्याची गरज आहे. जगभरात तैनात असणाऱ्या सैन्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यास अमेरिकेने सुरवात केली आहे. तेथील परिस्थिती आणि समिकरणे लक्षात घेऊन त्यात बदल करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या भाषणात त्यांनी चीनच्या भीतीवरच अधिक भाष्य केले. चीनने जगभरात निर्माण केलेल्या भयाच्या वातावरणाकडे लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.