मुंबई – नायक, खलनायक आणि विनोदी कलाकार या तीनही भूमिका अगदी चोखपणे आणि सहजतेने निभावणारे बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते ‘परेश रावल’ यांचा आज वाढदिवस आहे. परेश रावल यांचा जन्म 30 मे 1950 रोजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये झाला.
महाविद्यालयात नाटकातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे परेश रावल यांनी ‘अर्जुन’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
दरम्यान, हेराफेरी मधील त्यांच्या ‘बाबुराव’ या भूमिकेने त्यांनी लोकांच्या मनात एकच वेगळेच घर केले आणि प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचले.
परेश यांचे मुख्य सिनेमे ‘मेरे बाप पहले आप’, ‘भूल भुलैय्या’, ‘वेलकम’, ‘हॅट्रीक’ , ‘मालामाल-वीकली’, ‘भागम भाग’, ‘फिर हेरा फेरी’, ’36 चायना टाऊन’, ‘गोलमाल’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’. ‘ओह! माय गॉड’ इत्यादी चित्रपट सामील आहेत.
परेश रावल यांच्या खलनायक भूमिका जितक्या गाजल्या तितक्याच त्यांच्या विनोदी भूमिकाही प्रचंड गाजल्या. बाबुराव, हसमुखलाल, गुंड्या भाई सारख्या गाजलेल्या भूमिका लोकांच्या आजही लक्षात आहेत. परेश रावल आतापर्यंत तीन वेळा फिल्म फेअरचे मानकरी ठरले आहेत.