ईशान किशन-आदिती हुंडिया यांच्यात नात्यात दरी?

मुंबई : मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज बॅट्समन ईशान किशन आणि मॉडेल आदिती हुंडिया यांच्या नात्याची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर टाकून आपल्या नात्याची अनऑफिशियली माहिती देत असतात. परंतु त्यांच्या नात्यात आता मोठी दरी निर्माण झाल्याचं बोललं जातंय. त्याला कारण ठरली आहे आदिती हुंडायाची इंन्स्टाग्राम पोस्ट..!

वास्तविक ईशान किशन आणि आदिती हुंडिया एकमेकांच्या पोस्टवर लाईक आणि कमेंट करत असतात. तसंच एकमेकांच्या सोबतीने सोशल मीडियावर फोटो टाकत असतात. मात्र आता आदितीने केलेल्या पोस्टवरुन या दोघांच्या नात्यात मोठी दरी निर्माण झाल्याचं समोर येतात.

आदितीने आपल्या इंन्स्टाग्रामवर एक कोट शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणते, ‘प्रत्येक नातं लग्नापर्यंत जात नाही. काही नाती नवनवीन हॉटेल दाखवण्यात मदत करतात…!’ आदितीच्या या पोस्टवरुन ईशान आणि आदितीमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं म्हटलं जातंय.

मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज बॅट्समन म्हणून ईशान किशनची ओळख आहे. पाठीमागच्या काही मोसमात तो मुंबई इंडियन्स कडून खेळतो आहे. आपल्या आक्रमक बॅटिंगने त्यांने क्रिकेट रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मुंबईच्या मधल्या फळीतील खेळाडू म्हणून ईशान किशनने मुंबईला अनेक यादगार मॅचेस जिंकून दिल्यात. मात्र 14 व्या मोसमात त्याला अपयश आलं. त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत.

क्रिकेटपटू ईशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंडिया पेशानं मॉडेल आहे. 2017 सालच्या फेमिना मिस इंडियाची ती फायनलिस्ट राहिलेली आहे. तसंच 2018 साली तिने सुपर नॅशनल इंडियाचं पदकही जिंकलं आहे. आतापर्यंत ईशान आणि आदित्यने ऑफिशिअली आपल्या नात्याबद्दल सांगितलेलं नव्हतं. परंतु सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची मात्र जोरदार चर्चा रंगायची.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.