बॉलीवूडची “मस्तानी’ अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या सर्वात आघाडीची अभिनेत्री आहे. अभिनयासोबत दीपिका तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. सध्या ती पती रणवीरसोबत मुंबईमध्ये होम क्वारंटाइन आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी तिने एका मजेदार गोष्टीचा खुलासा केला.
दीपिका म्हणाली, मी आणि माझी बहीण अनिशा बालपणी रूम शेअर करायचो. आम्ही सोफ्यावर बसून तासन्तास “हाऊस’ खेळायचो. आमच्या घराच्या भिंतीवर त्यावेळी हॉलीवूड सिनेमा टायटॅनिकचा अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओची बरीच पोस्टर होती. आम्ही दोघीही झोपण्याआधी त्यावर किस करून त्याला गुडनाइट म्हणायचो आणि मग झोपायचो. दीपिका पदुकोण नेहमीच तिच्या बहिणीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
दरम्यान, दीपिका पदुकोण शेवटची छपाक चित्रपटात झळकली होती. ज्यात तिने एका ऍसिड हल्ला पीडित मुलीची भूमिका साकारली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेच खूपच कौतुक झाले होते. आता ती लवकरच रणवीर सिंहसोबत “83′ या सिनेमात दिसणार आहे.