पुणे – तरुणावर कॅनॉल परिसरात धारदार हत्याराने डोक्यात व इतर ठिकाणी वार करण्यात आले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली, याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चार अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला.
विकास सखाराम राठोड (28,रा. रामनगर) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ रविदास राठोड(32) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा भाऊ कॅनॉल रोडने चालला असाताना आरोपींनी त्याला गाठून धारदार शस्त्राने वार केले. डोक्यावर व पाठीवर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक पी.बी.कणसे करत आहेत.