मुंबई – सहजसुंदर अभिनय आणि घायाळ करणारं सौंदर्य तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे मराठी अभिनेत्री ‘प्राजक्ता माळी’ने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.
चित्रपट असो किंवा पसर्नल लाईफ अगदी आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ही ती आपल्या फॅन्ससह शेअर करते. आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. तिचे फॅन्सही तिच्या फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती देत असतात.
दरम्यान, प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर साडी परिधान केल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. यात ती आतापर्यंत न दिसलेल्या अशा अंदाजात दिसली आहे. प्राजक्ताचा हा लूक तिच्या फॅन्सना आवडला आहे. ब्युटिफूल, फॅब्युलस अशा कमेंट्सच्या तिच्या फोटोवर आल्या आहेत.
छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताने आपल्या अभिनयाची मोहिनी दोन्हीकडे घातली. अभिनेत्री प्राजक्ता हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. कधी कधी प्राजक्ता सोशल मीडियावर बोल्ड फोटोशूट पोस्ट करताना सुद्धा दिसत असते.
View this post on Instagram
मेंदीच्या पानांवर…. मन अजून झुलते गं…… . #prajaktamali #distraction #instagram @🌿