पाबळ-येथील सदाशिव दत्तात्रय संभूदास व त्यांचा मुलगा माऊली दररोज किमान पन्नास नागरिकांसाठी कापडी मास्क तयार करून मोफत देत आहेत. ग्राम पंचायत सदस्य अमोल जाधव हे या मास्कचे गरजूंना वाटप करीत आहेत.
पाबळ गावात गेली 45 वर्षांपासून वारकरी सांप्रदाय जपणारं आणि चिमुकल्या पिढीला गेली अनेक वर्षे हार्मोनियम, तबला आणि पखवाद आत्मीयतेने शिकविणारे एक साधभोळं आणि सरळमार्गी कुटुंब. आपल्या उत्पन्नाच्या स्रोतातून कोरोनाच्या विरोधात खारीचा वाटा घेऊन उतरले आहे. वास्तवात शिवणकाम हा या कुटुंबाचा मुख्य उत्पन्न स्त्रोत गेली अनेक दिवस करोना या विषाणूने गाव हैराण असताना समाजाची पर्यायाने गावाची खरी गरज ओळखून स्वतःच्या उदरनिर्वाहाची चिंता न करता गेले आठ दिवसांपासून रोज हे कुटुंब अंदाजे गावासाठी 50 ते 70 मास्क (आजपर्यंत अंदाजे 400) स्वखर्चाने स्वतः: शिवून देत आहेत.