पणजी – देशातील पहिले कोरोनमुक्त राज्य बनण्याचा मान गोव्याने पटकावला असून यामुळं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशातच आज गोवा मुख्यमंत्र्यांच्या एका कृतीमुळे ते पुन्हा एकदा सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरलेत.
त्याचं झालं असं की, मूळचे डॉक्टर असलेल्या प्रमोद सावंत यांचा आज वाढदिवस. आपल्या वाढदिवसाची सुरुवात आगळ्या-वेगळ्या पद्धतीने करत सावंत यांनी असीलो रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची तपासणी केली.
यावेळी सावंत यांनी रुग्णालयातील कर्मचारी, तपासणीसाठी आलेले रुग्ण, रुग्णालयात दाखल करण्यात आलेले रुग्ण या सर्वांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. एकीकडे देशामध्ये कोरोना विषाणूचे संकट ओढवले असताना काही डॉक्टर्स रुग्णालये बंद करून सेवा नाकारतायेत तर दुसरीकडे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सांभाळत असतानाही वाढदिनी डॉक्टरी कोट चढवून प्रमोद सावंत रुग्णसेवा करतायेत.
Goa Chief Minister Dr Pramod P Sawant today spent the morning hours of his birthday attending patients at Outpatient Department of Asilo Hospital at Mapusa: Goa Chief Minister’s Office pic.twitter.com/JDJIUB0JGN
— ANI (@ANI) April 24, 2020