बारामती: कोरोना या विषाणूजन्य आजाराने जगभर थैमान घातले आहे. आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. बारामती तालुक्यातील निरावागज या गावात देखील गावकऱ्यांच्या आरोग्यसाठी गाव कारभारी धावून आले.
येथील श्री वाघेश्वरी माता सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने निरावागज गावात कोरोना रोगाच्या साथीचा सर्दी ,खोकला, ताप यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. डॉ. शेखर देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गावातील लोकांच्या घरोघरी जाऊन गोळ्यांचे वाटप करण्यात आले. या कार्याचा शुभारंभ आज करण्यात आला त्याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक मदानराव देवकाते, सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव देवकाते, वाघेश्वरी सामाजिक प्रतिष्ठानचे सचिव गणपतराव देवकाते, बाळासो देवकाते, केशवराव देवकाते,सोमनाथ भोसले, गोविंदराव देवकाते, नंदूआबा देवकाते, नामदेव मदने, आबासो देवकाते आदींनी या कामात पुढाकार घेतला. ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे. गाव पातळीवर देखील याची दखल घेण्यात आले आहे.गावतील नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने हिमोग्लोबिनच्या गोळ्यांची वाटप करण्यात आले आहे. गावातील नागरिकांना खबरदारीचे उपाय घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. कोरोनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावगाडा बंद ठेवण्यात आला आहे.