पुणे – शहरात पर्वती टेकडीच्या परिसरात जनता वसाहत मध्ये १०८ गल्ली मध्ये अनेक लोक राहत आहेत. ही वस्ती अत्यंत दाटीवाटिची असल्याने येथे कोरोनाच्या विषाणू चा संसर्ग इतर नागरिकांना होऊ नये म्हणून स्थानिक सामाजिक कार्यकर्ते हमीद इनामदार यांनी आपल्या शिवाजी मित्र मंडळाच्या सदस्यांच्या मदतीने एक अनोखा जनजागृतीचा उपक्रम हाती घेतला.
ज्या मध्ये त्यांनी नागरिकांचा रोजच्या येण्या-जाण्याच्या ठिकाणी कागदाचे पोस्टर तयार करून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी काय केले पाहिजे याचा संदेश लिहिला आहे.ज्या मध्ये दुकानात वस्तू खरेदी करण्यासाठी गेल्यावर दोन लोकांमध्ये अंतर ठेवा विनाकारण गर्दी करू नका,रोज सतत हात साबणाने धुवा.वैयक्तिक स्वछता ठेवा.ह्या चित्रांमधील संदेश नागरिकांना समजावा म्हणून त्यांनी त्याला साजेसे चित्र सुदधा काढले आहेत.
या प्रसंगी त्यांच्याशी बोलल्यावर एक गोष्ट त्यांनी सांगितले की,या कोरोनाची संक्रमण साखळी तोडण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा विविध मार्गातून नागरिकांना प्रबोधन करत आहे रोज पोलीस अधिकारी सुद्धा जनता वसाहत भागात फिरून नागरिकांना सतत समजावून सांगत आहेत.परंतु त्यांच्या या प्रयत्ना मध्ये आपला सुद्धा सहभाग असावा या उद्देशाने आजच्या बंद च्या काळात ही संकल्पना प्रत्यक्ष उतरविण्यासाठी रंगीत खडू,कागद मिळने अशक्य असताना संपूर्ण वस्ती मधून मिळेल तेथून या सर्व गोष्टी उपलब्ध करून ही योजना प्रत्यक्ष उतरवली आहे त्यांची ही कल्पना अत्यन्त उत्तम असून याचा संपूर्ण भागात नक्की उपयोग होणार आहे.
जय शिवाजी मित्र मंडळ येथे कोरोना चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी परिसरात ठीक ठिकाणी पोस्टर लावून लोकांमध्ये जन जागृती करत आहेत. यामध्ये जे पोस्टर बनवण्यात आले आहेत ते बनवताना पोस्टर, पेपर, कलर, स्केचपेन याची कमतरता जाणवत होती म्हणून मंडळाचे अध्यक्ष यांनी मंडळात राहत असलेल्या नागरिकांना वरील वस्तूंची मागणी केली असता कोणी पोस्टर कट करून दिले, कोणी दुकानातून पुठ्ठे आणून दिले, कोणी स्केच पेन आणून दिले तर कोणी पोस्टर लावायला मदत केली.
पोस्टर मध्ये विविध प्रकारचे माहिती देण्यात आली आहे जसे दुकानासमोर गर्दी करू नका, सुरक्षित अंतर ठेवा, साबणाने हात धुवा, व तसेच हे सर्व पोस्टर ज्यांना वाचता येत नाही अश्या लोकांना चित्रांच्या स्वरूपात पण पोस्टर लावण्यात आले आहेत. या सर्व गोष्टी दत्तवाडी पोलिस स्टेशन अंतर्गत चालू आहेत व या कामासाठी दत्तवाडी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ निरीक्षक यांचे ही सहकार्य लाभले आहे.