नागठाणे – पुणे बेंगलोर महामार्गावर माजगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीत ऑइल टॅंकर पलटी होऊन अपघात झाला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून कोल्हापूरकडे ऑईल घेऊन निघालेल्या भरधाव टॅंकरच्या चालकाचा गाडीवरील ताबा महामार्गावरील माजगाव गावाजवळील बाब पंजाबी ढाबा येथे सुटला. यावेळी टॅंकर महामार्गालगतच्या चरीत जाऊन पलटी झाला. अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र टॅंकरमधील संपूर्ण ऑईल वाहून गेल्याने व टॅंकर पलटी झाल्याने मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच बोरगावचे सपोनि चंद्रकांत माळी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. उशिरापर्यंत टॅंकर क्रेनच्या सहाय्याने सरळ करण्याचे काम सुरू होते.