मंचर – जाती आणि धर्माच्या विचारा पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करावा. धर्मांधता आणि अंधश्रद्धेला बळी पडू नये. सर्वजण एकत्र आले तर देशाची प्रगती होईल, असे आवाहन साहित्यिक आणि जादूगार शकील जाफरी यांनी केले. चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर शकील जाफरी बोलत होते.
यावेळी अभिजीत इंदोरे, दत्तात्रय काळे, कृष्णराव हुले, ग्रामपंचायत सदस्या सुजाता इंदोरे, शिक्षिका बेबी आवटी, शारदा सोनवणे, साधना सांडभोर यांच्यासह विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शकील जाफरी यांनी जादूच्या प्रयोगांच्या माध्यामातून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता इत्यादी विषयांवर जनजागृती केली. मुख्याध्यापक सोपान केदारी यांच्या हस्ते शकील जाफरी यांचा सत्कार करण्यात आला. परवेझ तांबोळी यांनी आभार मानले.