लंडन – दहशतवादी कारवाया घडवून आणण्याची जबाबदारी असणे, त्यासाठी आवश्यक ती तयारी करणे आणि दहशतवादी कारवायांसाठी चिथावणी देण्याच्या संशयावरून पोलिसांनी 21 वर्षीय युवकाला अटक केली आहे. या तरुणाचे नाव घोषित केले गेलेले नाही.
पूर्व लंडनमधील त्याच्या घरातूनच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याला संशयावरून अटक करण्यात आली असल्याचे महानगर पोलीस विभागाने म्हटले आहे. त्याला दक्षिण लंडनमधील पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून सध्या तो पोलिसांच्या कोठडीमध्ये आहे. पोलीस त्याच्या घराची तपासणी करत आहेत, असेही प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.