राणी मुखर्जीच्या “मर्दानी-2′ चे ट्रेलर गुरुवारी रिलीज झाले. ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मात्र रिलीज झाल्यानंतर थोड्याच वेळात ह्या ट्रेलरबाबत वादंग उठायला सुरुवात झाली. कोटा शहरातल्या लोकांनी या सिनेमाच्या विरोधातली तक्रार लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे. या सिनेमात कोटा शहराला वाईट पद्धतीने दाखवण्यात आले आहे, अशी या सर्व लोकांची तक्रार आहे.
कोटा शहरात “मर्दानी-2’च्या विरोधात निदर्शनेही झाली असल्याचे समजते आहे. या सिनेमात पोलिस ऑफिसरच्या भूमिकेतली राणी मुखर्जी बलात्काराच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराचा शोध घेताना दाखवले गेले आहे.
सिनेमाचे सर्व शुटिंग कोटा शहरात झाले आहे. त्यामुळे कोटा शहरात बलात्कारासारखे गुन्हे घडत असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. कोटा शहर इंजिनिअरींग आणि मेडिकलच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे.
मात्र या सिनेमामुळे घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात कोटा शहराची प्रतिमा चुकीची निर्माण होईल, असे इथल्या व्यापाऱ्यांचे आणि समाजसेवकांचे म्हणणे आहे.
“मर्दानी-2′ सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमातून कोटा शहराचे नाव हटवून टाकावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 2014 मध्ये आलेल्या “मर्दानी’चा सिक्वेल असलेल्या “मर्दानी- 2′ 13 डिसेंबरला रिलीज होणार आहे.