मुंबई – बॉलिवुड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारित असलेल्या बायॉपिकमध्ये परिणीती झळकणार आहे.
या बायॉपिकमध्ये आपली भूमिका सक्षमपणे साकारण्यासाठी ती ट्रेनिंग घेत आहे. परिणीतीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर या चित्रपटातील शूटिंगबाबतचे अपडेट ती नेहंनीच आपल्या फॅन्ससोबत शेअर करीत असते.
यातच परिणीतीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. ज्यात ती पाठमोरी बसलेली असून तिच्या मानेवर निळ्या रंगाच्या पट्ट्या लावलेल्या दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये परिणीतीनं लिहिलं, मी आणि ‘सायना’ची पूर्ण टीम प्रयत्न करत होती की मला दुखापत होऊ नये पण काही तरी गडबड होतेच. मी जेवढा होईल तेवढा आराम करुन पुन्हा बॅडमिंटन खेळायला सुरुवात करेन. मात्र परिणितीला दुखापत झाल्यानं या बायोपिकचं शुटिंग पुन्हा एकदा लांबणीवर पडलं आहे.
दरम्यान, यापूर्वी ही या चित्रपटाचे शूटिंग लांबणीवर पडलं होत. परिणीती अगोदर या बायॉपिकमध्ये श्रद्धा कपूर मुख्य भूमिका साकारणार होती. तसेच श्रद्धाने या चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले होते. मात्र, शूटींगच्या तारखा जुळत नसल्याचे कारण देत श्रद्धाने चित्रपटातून काढता पाय घेतला.
परिणीती चोप्राच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास “भुज: द प्राइड ऑफ इंडिया’, “जबरिया जोड़ी’ आणि हॉलिवुडमधील “द गर्ल ऑन द ट्रेन’च्या हिंदी रीमेकमध्ये ती झळकणार आहे.