दही खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का ?

आपल्या रोजच्या आहारामध्ये दूध, दही यांचा समावेश केल्याने शरिराला अनेक फायदे होतात. दह्यामध्ये अनेक प्रकरचे प्रोटीन्स असतात. एक वाटी ताजे दही तुम्हाला अनेक आजरांपासून दूर ठेवण्यास मदत करते. दह्यामध्ये बॅक्टेरियाचा समावेश असल्याने तुमचे आरोग्य निरोगी राहते. दही खाणे हे आरोग्यासाठी लाभदायी आहे. चला तर मग जाणून घेऊयात दही खाण्याचे फायदे…

दही खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे –

1. दही खाल्ल्याने पोटाच्या विकारांपासून आराम मिळतो. अनेकांना गॅसेसची समस्या असते, अशा लोकांनी तर दह्याचे सेवन जरूर करावे.

2. दह्यामुळे तुमच्या शरिराचा पीएच संतुलित राहतो. दह्याने शरिरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते.

3. रोज एक वाटी दही खाल्ल्याने तुमच्या शरिराची पचनक्षमता वाढते.

4. त्वेचेसाठी दही अतिशय फायदेशीर आहे. दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्याने तुमचे केस आणि त्वचा या दोन्हींसाठी दही खाणे अतिशय चांगले आहे.

5. दह्याचे वापराने चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होते, तसेच दही केसांना लावल्याने केसांच छान कंडिशनिंग होत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here