पुणे : मुलांमध्ये पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयडेंटीटी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या पर्यावरणपूरक दिवाळी या आगळया वेगळया उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शहरातील वेगवेगळया वस्त्यांमधील सुमारे 100 हून अधिक मुलांना आकाशदिवे तसेच शुभेच्छापत्रे तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच मुलांनी हे प्रशिक्षण आपल्या भागातील नागरिक तसेच इतर मुलांनाही प्रशिक्षण द्यावे यासाठी त्यांना साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी या उपक्रमात सहभागी झालेल्या मुलांना मातीच्या पणत्या तयार करणे, रंगविणे, कागदाचे आकाशदिवे तयार करणे, दिवाळीसाठी शुभेच्छापत्र तयार करणे याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी मुलांना आवश्यक असलेले साहित्य संस्थेकडून उपलब्ध करून देण्यात आले. संस्थेच्या विश्वस्त संगीता शिंदे यांच्यासह शिक्षिका निता भांडवलकर,योगीता पगारे, अनुराधा आंग्रे, सुनीता कांबळे, नुतन शिंदे, सविता बिडकर , शितल भोसले यांच्यासह राजेंद्र कोळी, विष्णू कोळी यांनी मुलांना प्रशिक्षण देण्यासह कार्यक्रमाचे संयोजनही केले.