व्यावसायिकाला गंडा : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे – वाईन निर्मिती परवाना मिळवून देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची 1 कोटी 87 लाखाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सनी बाळासाहेब तुपे (35, रा. छाया आकाणिया गार्डन, मगरपट्टा सिटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दयानंद उचुल वणंजे (रा.नांदेड), दिलीप काशीनाथ काळभोर (रा.लोणी काळभोर), खंडुू पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला वाईन निर्मितीचा परवाना मिळवून देतो, असे आश्वासन दिले होते. यासाठी त्यांच्याकडून व त्यांच्या कुटुंबीयांकडून सन 2016 ते आजवर 1 कोटी 87 लाख रुपये उकळले. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचा परवाना दिला नाही. परवाना न मिळाल्याने फिर्यादी यांनी पैशांची मागणी केली असता, दयानंद याने “आत्महत्या करतो’ असा धमकीचा मेसेज पाठवला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक खेडेकर करत आहेत.