कार्तिक आर्यन आणि साराच्या जवळीकीमुळे अमृता सिंह टेन्शनमध्ये

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान त्यांच्या सिनेमापेक्षा त्यांच्या पर्सनल लाईफमुळेच अधिक चर्चेत असतात. हे दोघेही एकमेकांना डेट करत असतात, असा गॉसिप गॅंगचा अंदाज आहे. करण जोहरच्या कॉफी शो मध्ये सर्वात प्रथम साराने कार्तिकचे नाव घेतले आणि त्याला डेट करायची ईच्छा असल्याचे सांगितले होते. तेंव्हापसूनच त्यांच्यातील अफेअरची चर्चा रंगायला लागली होती. साराच्या त्या वाक्‍याचा आधार घेऊन इम्तियाझ अलीने “लव आज कल’मध्ये या दोघांना एकत्र काम करण्यची संधी दिली. तेंव्हापासून तर सारा-कार्तिकमधील जवळीक आणखीनच वाढायला लागली.

मात्र त्यांच्या या जवळीकीमुळे साराची आई अमृता सिंह मात्र टेन्शनमध्ये आली आहे. या जोडीच्या एकत्र मिसळण्यावर अमृता सिंह नाराज आहे, असे आता समजते आहे. सारा आपल्या डेटिंग लाईफमुळे चर्चेत यावी, हेच मुळात अमृता सिंहना पसंत नाही. साराने कार्तिकला भेटूच नये, असे अमृता सिंहला वाटते. मात्र सारा काहीही ऐकून घेण्यच्या मूडमध्येच नाही आहे. सारा आणि कार्तिक आर्यनचा “व्हॅलेंटाईन डे’ पुढच्यावर्षी 14 फेब्रुवारीला रिलीज होणार अहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.