Share Market| मागील दोन दिवसांपासून शेअर बाजारात घसरण दिसून येत होती. परंतु आज गुरुवारी शेअर बाजाराची तेजीसह सुरूवात झाली आहे. बाजारातील प्रमुख निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. बीसई सेन्सेक्स 260 अंकांच्या वाढीसह 73,203 अंकांच्या पातळीवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 64 अंकांच्या वाढीसह 22,212 अंकांच्या पातळीवर उघडला आहे.
मध्यम आणि लहान क्षेत्रात आज अधिक खरेदी होत आहे. ऑटो, मेटल आणि सरकारी बँकिंग समभागांकडून बाजाराला जोरदार पाठिंबा मिळत आहे. गुरुवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी आयटी वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह व्यवहार करत होते.
कोणते शेअर्स वधारले ? Share Market|
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात पॉवर ग्रिड, टाटा स्टील, ओएनजीसी, हिंदाल्को, अदानी पोर्ट्स, बीपीसीएल आणि एचडीएफसी लाईफचे शेअर्स वधारले. तर नेस्ले इंडिया, एचसीएल टेक, टायटन, ॲक्सिस बँक, अपोलो हॉस्पिटल, टेक महिंद्रा आणि सन फार्माच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
तर सेन्सेक्सच्या सर्वाधिक तेजीत पॉवर ग्रिड, Infosys, TCS, विप्रो यांचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत. तर एचसीएल टेक, नेस्ले, NPC, ॲक्सिस बँक, सन फार्माआणि टेक महिंद्रा यांच्या शेअर्स घसरलले दिसून आले. Share Market|
त्याआधी पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि कमकुवत जागतिक ट्रेंड दरम्यान मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले होते. या कालावधीत तीस शेअर्सवर आधारित बीएसई सेन्सेक्स 456.10 अंकांच्या किंवा 0.62 टक्क्यांच्या घसरणीसह 72,943.68 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 124.60 अंकांच्या किंवा 0.56 टक्क्यांच्या घसरणीसह 22,147.90 अंकांवर बंद झाला. तर बुधवारी भारतीय शेअर बाजाराला रामनवमीनिमित्त सुट्टी होती.
हेही वाचा:
gold silver price today। ग्राहकांनो.. खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सोने-चांदीच्या किंमती