C voter Opinion Poll lok sabha election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. यापूर्वी सी व्होटरच्या ओपिनियन पोलमध्ये धक्कादायक ट्रेंड समोर आले आहेत. 18 व्या लोकसभेच्या स्थापनेसाठी देशात एकूण 543 लोकसभेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यात 21 राज्यांतील 102 जागांसाठी मतदान होणार आहे.
त्रिपुरा के विकास के लिए हमारी सरकार के HIRA मॉडल की इसलिए देशभर में चर्चा हो रही है… pic.twitter.com/r0Pm7312jT
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2024
एनडीएला 47% मते आणि इंडिया अलायन्सला 40% मते –
सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार एनडीएला सर्व जागांवर 47 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे आणि इंडिया आघाडीला 40 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय अन्य राजकीय पक्षांना 13 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला एकूण 373 जागा मिळू शकतात, इंडिया अलायन्सला 155 जागा आणि इतर राजकीय पक्षांना 15 जागा मिळू शकतात.
सर्वेक्षण कसे करण्यात आले?
देशभरात लोकसभा निवडणुकीची उत्सुकता आहे. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या 48 तास आधी 17 एप्रिल रोजी प्रचार संपेल. यापूर्वी सी व्होटरने देशभरातील लोकसभेच्या 543 जागांवर सर्वेक्षण केले होते. माहितीनुसार, 11 मार्च ते 12 एप्रिल या कालावधीत झालेल्या या सर्वेक्षणात एकूण 57,566 लोकांशी बोलण्यात आले. सी व्होटरच्या मते, सर्वेक्षणातील त्रुटीचे मार्जिन अधिक उणे 3 ते अधिक उणे 5 टक्के असू शकते. न्यूज 24 या हिंदी वृत्तवाहिनीने हे सर्वेक्षण नोंदवले आहे.
कांग्रेस की गारंटी
✅ युवा न्याय
1. पहली नौकरी पक्की – हर शिक्षित युवा को 1 लाख रुपए की अप्रेंटिसशिप का अधिकार
2. भर्ती भरोसा – 30 लाख सरकारी नौकरियां, सभी खाली पोस्ट कैलेंडर के अनुसार भरेंगे
3. पेपर लीक से मुक्ति – पेपर लीक रोकने के लिए नए कानून और नीतियां… pic.twitter.com/q6CMpf1pT1
— Congress (@INCIndia) April 17, 2024
बिहारमध्ये एनडीएला 33 जागा मिळण्याची शक्यता –
सी व्होटरच्या मते, बिहारमधील लोकसभेच्या 40 जागांवर एनडीएची आघाडी होताना दिसत आहे. येथे केलेल्या सर्वेक्षणानुसार एनडीएला 33 तर इंडिया अलायन्सला 7 जागा मिळू शकतात. बिहारमध्ये एनडीएला 51 टक्के मते मिळतील, इंडिया आघाडीला 40 टक्के मते मिळतील, तर इतरांना 9 टक्के मते मिळतील.
उत्तर प्रदेशात एनडीएला 51 टक्के मते –
सर्वेक्षणानुसार, उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला 50 टक्क्यांहून अधिक मते मिळत आहेत. येथे एनडीएला 73 तर सपा-काँग्रेसला सात जागा मिळू शकतात. तर येथून बसपसाठी धक्कादायक बातमी आहे. यावेळी येथून बसपाचे खातेही उघडले जाणार नसल्याचा अंदाज आहे. मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास, इंडिया अलायन्सला 38 टक्के मते मिळू शकतात, बसपाला 4 टक्के आणि इतरांना 7 टक्के मते मिळू शकतात.
या राज्यांमध्ये ‘इंडिया’ पुढे –
सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार तामिळनाडूच्या सर्व लोकसभा जागांवर इंडिया अलायन्स पुढे आहे. येथे ‘इंडिया’ सर्व 39 जागा जिंकू शकतो. त्याचवेळी केरळमध्ये भाजपला आपले खाते उघडणे कठीण दिसत आहे. येथे युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (UDF) 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटकात काँग्रेसला 5 जागा मिळू शकतात. दुसरीकडे, तेलंगणात काँग्रेसला 10 जागा मिळण्याची शक्यता आहे.