Youtuber Garvit and Nandini : फेसबुक आणि यूट्यूबवर व्हिडिओ बनवणाऱ्या युट्युबर नंदिनी कश्यप आणि गरवित सिंग गॅरी यांनी हरियाणातील झज्जर जिल्ह्यात आत्महत्या केली. दोघांनीही सातव्या मजल्यावरील फ्लॅटवरून उडी मारून आत्महत्या केली. या जोडप्याच्या मृत्यूची बातमी ऐकून लोकांना आश्चर्य वाटले की त्यांच्यात काय झाले? त्यांनी आत्महत्या का केली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गर्वितचे वय 25 तर नंदिनीचे वय 22 वर्ष होते. दोघेही लिव्ह इन मध्ये राहत होते. गेल्या एक महिन्यापासून ते बहादूरगड येथील एका निवासी इमारतीत राहत होते. शनिवारी त्यांच्या आत्महत्येची घटना समोर आली होती.
कोण होती नंदिनी?
नंदिनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करायची, ती शांती विहार, विकास पुरम, डेहराडूनची रहिवासी होती. नंदिनीचे वडील प्रॉपर्टी डीलर आहेत. Insta वर नंदिनीचा आयडी doraperry442 नावाने आहे. सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडिओंमध्ये ती अनेक बॉलिवूड स्टार्ससोबत दिसली होती.
गरवीत सिंग गॅरी कोण होता?
गरवीत सिंग गैरी हा देखील डेहराडूनचा रहिवासी होता. शहरातील माजरा भागात त्याचे घर आहे. Garvit चे Garvit Garry Vlogs नावाचे YouTube चॅनल आहे. त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर गरवितने सांगितले की, तो एक थिएटर आर्टिस्ट आहे आणि त्याने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. गरवितचे वडील सुभेदार सिंह हे उत्तराखंड पोलिसात एएसआय आहेत.
View this post on Instagram
गरवित-नंदिनी यांचा संबंध –
गरवीत आणि नंदिनी एकत्र व्हिडिओ बनवायचे आणि यूट्यूबवर शेअर करायचे. दोघांनाही येथून चांगले उत्पन्न मिळाले. असे म्हटले जाते की, त्यांचे व्हिडिओ बनवण्यासोबतच ते दोघेही चित्रपटात काम करण्याचा प्रयत्न करत होते. दोघेही मुंबईला गेले. मिळालेल्या माहितीनुसार, गरवित आणि नंदिनीच्या कुटुंबीयांनाही त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अडचण नव्हती. अशा स्थितीत या आत्महत्येचे गूढ अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आमिर खानसोबतचा फोटो व्हायरल –
गरवीत आणि नंदिनी यांनी इंस्टाग्रामवर आमिर खान आणि विकी कौशलसोबतचे फोटोही शेअर केले आहेत, जे आता व्हायरल होत आहेत. मात्र, या दोघांचा आमिर खानशी काय संबंध होता, याची माहिती मिळालेली नाही. हे दोघे एका कार्यक्रमात भेटले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.