रांची – झारखंडमध्ये १२ माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. झारखंडमधील पश्चिम सिंघभूम जिल्ह्यात गुरुवारी या माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचे पोलिसांनी सांगितले. (12 Maoists of Misir Besra Maoist group surrender before police )
हे नक्षलवादी झारखंडमधील सारंदा आणि कोल्हान जिल्ह्यांममधील घनदाट जंगलांमध्ये सक्रीय होते. हे सर्व जण मिसीर बेसराच्या माओवादी गटाशी संबंधित आहेत. मिसीर बेसरावर तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षीस लावण्यात आले आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पश्चिम सिरघुम हा नक्षलप्रभावित जिल्ह्यांपैकी एक मानला जातो आहे. या जिल्ह्यात गेल्या वर्षात नक्षलीसंबंधात ४२ घटना घडल्या असून २२ जणांच्या हत्या झाल्या आहेत. येत्या १३ मे रोजी पश्चिम सिरघुम जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठीचे मतदान होणार आहे. तब्बल दशकभरानंतर या भागात लोकसेभसाठी मतदान होणार आहे.