IPL 2024, PBKS vs SRH : आयपीएलच्या 23 व्या सामन्यात पंजाब किंग्जसमोर सनरायझर्स हैदराबादचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चंदीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे.
पंजाब संघाने 4 पैकी 2 सामने जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत. त्याने दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्सचा पराभव केला आहे. दुसरीकडे, सनरायझर्सनेही 4 पैकी 2 सामने जिंकले आहेत आणि 2 गमावले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्सने पराभूत केले आहे.
त्याचबरोबर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विजय मिळवले आहेत. पंजाबचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. । IPL 2024, PBKS vs SRH
दरम्यान, आतापर्यंत पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 21 सामने झाले आहेत. हैदराबादने 14 सामने जिंकले आहेत. पंजाबने केवळ 7 सामने जिंकले आहेत. या स्पर्धेत दोन्ही संघांची कामगिरी संमिश्र झाली आहे.
पंजाब आणि सनरायझर्स या दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकले आहेत आणि 2-2 सामने गमावले आहेत. आता कोणता संघ तिसरा विजय मिळवतो हे पाहायचे आहे. । IPL 2024, PBKS vs SRH
पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन म्हणाला की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. विकेट तशीच राहील, त्यामुळे त्यांना कमी धावसंख्येपर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न असेल. शेवटचा सामना जिंकण्यासाठी आम्ही भाग्यवान ठरलो.
हे चांगले आहे की आम्ही कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून नाही. आम्ही दोन गेम जिंकले आहेत, चांगल्या धावांची अपेक्षा आहे. लियाम लिव्हिंगस्टोन अजूनही बरा होत आहे. आम्ही त्याच संघात खेळत आहोत.’
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, सॅम कुरन, शशांक सिंग, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.
सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (क), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.