Raj Thackeray । MNS Gudi Padwa Melava | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज भव्य गुढीपाडवा मेळावा पार पडला असून, यासाठी शिवाजी पार्कमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हा मेळावा होत असल्याने ते कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
चला शिवतीर्थावर ! #मनसे_पाडवामेळावा #MNSGudhiPadwaRally pic.twitter.com/3p5qi70TyV
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 6, 2024
मागील काही दिवसांपासून मनसे महायुती दाखल होण्याच्या चर्चांना उधाण आले. यापूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजप आणि मनसे युतीच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अद्यापही याबाबत कोणतीही घोषणा झाली नसल्याने आजच्या मेळाव्यात राज ठाकरे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसे मेळाव्यात कशी असणार पोलीस सुरक्षा ?
शिवाजी पार्क मैदानात आज 300 पोलीस शिपाई आणि 35 पोलीस अधिकारी सुरक्षेसाठी असणार आहे. गर्दीचं नियोजन करण्यासाठी एक विशेष पथक असणार आहे. मनसे कार्यकर्त्यांना शिवाजी पार्कमध्ये येण्यास कुठलाही त्रास होऊ नये,
म्हणून मनसेचे 100 सुरक्षा रक्षक असणार आहेत. ते वाहतुकीसाठी मदत करणार आहेत. सभेच्या ठिकाणी 500 स्वयंसेवक आणि 100 वॉर्डन सुद्धा उपस्थित राहणार आहेत.