खालापूर, (वार्ताहर) – विवाहबाह्य संबंध ठेवत प्रियकर दुसरे लग्न करीत नसल्याने प्रियसीने प्रियकराला परभणीहून खोपोलीत बोलावून झोपेत गळा दाबून खून केला. त्यानंतर मोठ्या ट्रॅव्हलर बँगमधून मृतदेह कोल्हापूरच्या हद्दीत पेट्रोलने जाळून टाकला. खोपोली पोलिसांनी गुन्हयाचा तपास करीत आरोपी प्रियसी आणि साथीदाराला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार परभणीत राहणारा प्रियकर (वय 38) व प्रियसी (वय 44) या दोघांचेही लग्न झालेले असतानाही विवाहबाह्य संबध होते. प्रियकराने प्रियसीला लग्नाचे आश्वासन दिले होते. तसेच वेळोवेळी तिच्याकडून पैसे घेतले होते. प्रियसी प्रियेकडाकडे वारंवार लग्न करण्याची व तिचे पैसे परत करण्याची मागणी करीत होती.
परंतू प्रियेकर हा तिचेशी लग्न करण्यास व पैसे परत करण्यास टाळाटाळ करीत होता. त्या रागापोटी प्रियसीने प्रियकराला परभणीहून खोपोली येथे 24 मार्च रोजी बोलावून घेतले व त्यास एका रूममध्ये ठेवले. ती त्यास तेथे जावून भेटत होती. प्रियकर लग्नही करीत नव्हता व पैसेही परत करीत नव्हता. त्यामुळे संतापलेल्या प्रियसीने 27 मार्च रोजी प्रियकराला झोपेच्या गोळ्या दिल्या.
रात्री 23.30 वाजताच्या सुमारास प्रियसीने आपल्या साथिदारास बोलावून दोघांनी मिळून प्रियकराचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपींनी ट्रॅव्हलर बँगमधून मृतदेह ठेवून कारमधून कोल्हापूरमधील मुम्मेवाडी घाटामध्ये रोडच्या बाजुला पेट्रोलने जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी तपासचक्र चालवत सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक केली.