GT vs SRH : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा बारावा सामना खेळला जात आहे. सनरायझर्सने गुजरातसमोर विजयासाठी १६३ रन्सचं लक्ष ठेवलं आहे. शुभमन गिल आणि वृद्धिमान सहा यांनी गुजरातच्या डावाची सुरुवात केली.
गुजरातच्या ओपनर्सने चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला परंतु पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शाहबाज अहमदने वृद्धिमानची विकेट घेत त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले अन् गुजरातला पहिला धक्का बसला. सहा 25 धावा करून बाद झाला. | GT vs SRH
त्यानंतर शुभमन गिलने सुदर्शनच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु गिलच्या रूपाने गुजरातला दुसरा झटका बसला. दहा ओव्हर्सनंतर गुजरातने दोन विकेट्स गमावून ७७ रन्स केले आहेत. | GT vs SRH
Match 12. WICKET! 9.1: Shubman Gill 36(28) ct Abdul Samad b Mayank Markande, Gujarat Titans 74/2 https://t.co/hdUWPFsHP8 #TATAIPL #IPL2024 #GTvSRH
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2024
सनरायझर्सला शेवटच्या ओव्हर्समध्ये देखील रन्स आले नाहीत
हैदराबाद संघाने 20 व्या षटकात तीन विकेट गमावल्या. शेवटचे षटक टाकण्यासाठी मोहित शर्मा आला. या षटकात त्याने फक्त तीन धावा दिल्या. तसेच दोन विकेट्स घेतल्या. अखेरच्या चेंडूवर अब्दुल समद धावबाद झाला. मोहितने एकूण तीन विकेट घेतल्या. तर हैदराबादसाठी समदने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 14 चेंडूत 29 धावांची खेळी खेळली. अभिषेकने 20 चेंडूत 29 धावा केल्या.
गुजरात टायटन्स प्लेईंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), ऋद्धिमान साहा, अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, नूर अहमद, मोहित शर्मा आणि दर्शन नळकांडे.
सनरायझर्स हैदराबाद प्लेईंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि जयदेव उनाडकट.