GT vs SRH : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा बारावा सामना खेळला जात आहे. सनरायझर्सने गुजरातसमोर विजयासाठी १६३ रन्सचं लक्ष ठेवलं आहे. शुभमन गिल आणि वृद्धिमान सहा यांनी गुजरातच्या डावाची काहीशी संथ सुरुवात केली. मात्र साई सुदर्शन आणि डेव्हिड मिलरच्या चांगल्या खेळीने गुजरातचा विजय सोपा झाला. | GT vs SRH
गुजरातच्या ओपनर्सने चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला परंतु पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शाहबाज अहमदने वृद्धिमानची विकेट घेत त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले अन् गुजरातला पहिला धक्का बसला. सहा 25 धावा करून बाद झाला.त्यानंतर शुभमन गिलने सुदर्शनच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु गिलच्या रूपाने गुजरातला दुसरा झटका बसला. दहा ओव्हर्सनंतर गुजरातने दोन विकेट्स गमावून ७७ रन्स केले होते. | GT vs SRH
त्यानंतर मैदानात साई सुदर्शनने डी. मिलरच्या मदतीने चांगली भागीदारी रचली. मात्र अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या सुदर्शनला (४५) कमिन्सने आऊट करत ही जोडी फोडली आणि सतराव्या ओव्हरमध्ये गुजरातला तिसरा झटका बसला. यानंतर सामन्यात काहीशी चुरस निर्माण होईल असं वाटत होत मात्र मैदानात आलेल्या शंकरने सेट असलेल्या मिलरला उत्तम साथ दिली आणि विजय सुखकर केला. | GT vs SRH
गुजरातने हा सामना 7 विकेटने जिंकला आहे. या सामन्यात मिलर आणि सुदर्शन यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. हा सामना जिंकून गुजरात रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
Match 12. Gujarat Titans Won by 7 Wicket(s) https://t.co/hdUWPFsHP8 #TATAIPL #IPL2024 #GTvSRH
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2024
गुजरात टायटन्स प्लेईंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), ऋद्धिमान साहा, अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, नूर अहमद, मोहित शर्मा आणि दर्शन नळकांडे.
सनरायझर्स हैदराबाद प्लेईंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि जयदेव उनाडकट.
Purple Cap IPL 2024 : 11 सामन्यांनंतर पर्पल कॅप कोणाकडे ? वाचा सविस्तर..
मयंक यादवच्या स्पीडवर प्रिती झिंटा फिदा ! ‘डिंपल गर्ल’च्या रिऍक्शनची सोशल मीडियावर चर्चा