Lok Sabha Election 2024 । निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहे. या निवडणुकीत भाजपसह सर्व राजकीय पक्षाने प्रचाराला सुरुवात केली आहे. निवडणुकीत सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ‘मतदार’ मतदाराला आकर्षक करण्यासाठी सर्व राजकीय नेत्यांसह पक्षातील कार्यकर्ते हटके प्रचार करतांना दिसत. अशात हटके प्रचार सध्या चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर लग्नाची पत्रिका व्हायरल होत आहे. या पत्रिकेत मुलाचा लग्नाला गिफ्ट आणू नका पण मोदींना मत द्या असा मजकूर लिहिला आहे. ही लग्न पत्रिका सध्या चर्चेत आली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, तेलंगणातील संगारेड्डी येथे मुलाच्या लग्नासाठी वडिलांनी छापलेले कार्ड सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. या कार्डमध्ये वराच्या वडिलांनी पाहुण्यांना भेटवस्तू सोबत आणण्याऐवजी आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. कार्डवर नरेंद्र मोदींचा फोटोही छापण्यात आला आहे. हा विवाह 4 एप्रिल 2024 रोजी होणार आहे.
हे प्रकरण हैदराबादजवळील संगारेड्डी जिल्ह्यातील आहे. येथे राहणाऱ्या नंदीकांती नरसिम्हालू आणि निर्मला या दाम्पत्याचा मुलगा साई कुमारचा विवाह ४ एप्रिल रोजी होणार आहे. साई कुमारच्या वधूचे नाव महिमा राणी आहे. TOI नुसार, नंदीकांतीने कार्ड छापण्यासाठी तिच्या कुटुंबीयांचा सल्ला घेतला. शेवटी त्यांनी कार्डवर नरेंद्र मोदींचा फोटो छापला.
कार्डच्या तळाशी लिहिले आहे, “कृपया तुमच्यासोबत कोणतीही भेटवस्तू आणू नका. पंतप्रधान मोदींना मत द्या. तुमचे एक मत आमच्यासाठी सर्वोत्तम भेट ठरेल.” कार्डच्या वरच्या बाजूला, एका बाजूला गणपतीचा फोटो आहे आणि दुसऱ्या बाजूला शिव आणि पार्वतीचा फोटो आहे. खाली छापलेल्या मोदींच्या फोटोच्या पुढे हळद लावली आहे. हिंदू धर्मात हळद लावणे शुभ मानले जाते.
नंदीकांती नरसिंहालू लाकडापासून बनवलेल्या वस्तूंचा व्यापार करतात. याआधी त्याने आपल्या दोन मुलींची लग्ने केली होती. मात्र, त्या मुलींच्या लग्नपत्रिकेत त्यांनी याचा वापर केला नाही. नंदीकांतीच्या म्हणण्यानुसार, जो कोणी ते कार्ड वाचतो, त्याची नजर काही काळ तिथेच स्थिर राहते. या लग्न पत्रिकेवर आता युजर्स संमिश्र प्रतिक्रिया देत आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. देशात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. 7 टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीची मतमोजणी 4 जून 2024 रोजी होणार आहे. सात टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकांसाठी १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
हे वाचले का ? मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा फायदा आम आदमी पक्षाला होणार का?